पथकात सहभागी होण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी असणे बंधनकारक आहे
पथकात सहभागी होण्यासाठी आपण शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे आहे
पथकातील नोंदणीसाठी रु. ५०० फक्त शुल्क आकारले जाते (फक्त पहिल्यावेळी)
पथकाची ओळख, टोपी आणि ओळखपत्र इ. साठी पथकाकडे नाममात्र शुल्क आकारले जाते व पथकाचा लागणारा गणवेश वादकाने स्वखर्चाने घ्यावा लागेल
आपण अनुभवी असाल अथवा नसाल, सरावादरम्यान आपणास संपूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते
पथकाचा सराव हा दररोज सायं. 5 ते 9:30 या वेळेत होतो तसेच शनिवार आणि रविवार गरजेनुसार जास्त वेळ सराव घेतला जातो.
पथकाच्या सरावास नियमित उपस्थिती आवश्यक आहे
पथकात ध्वजाचा सराव करणे हे सर्व वादकांना बंधनकारक आहे
सरावादरम्यान व मिरवणुकीच्या वादनादरम्यान सर्वांना वादन करण्याची संधी मिळेल यासाठी पथक नेहमी प्रयत्नशील असते
सराव आणि मिरवणुकांमधील उपस्थिती पाहून वादकास वादनाची संधी दिली जाते
ज्या वादकांना नोकरी/व्यवसाय/कॉलेज अथवा दूरचा प्रवास इ. मुळे रोज सरावाला येणे शक्य नसल्यास पथकाच्या नियोजन समितीशी संपर्क करावा, शक्यतोपरी योग्य तो मार्ग काढण्यासाठी पथक नक्कीच प्रयत्न करते
सराव दरम्यान कोणताही अपघात अथवा दुखापत झाल्यास पथक जबाबदार राहणार नाही
नोंदणी केल्यानंतर पुढील १५ दिवस आपली उपस्थिती पाहूनच पथकाचा सभासद अर्ज आपणास देण्यात येतो
पथकातील प्रवेशाचे सर्वाधिकार पथकाच्या कार्यकारिणीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत, त्यासंबंधी कोणालाही उत्तर देण्यास कार्यकारिणी बांधील राहणार नाही
पथकाचे नियम आणि शिस्त यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे
वादकाकडून पथकाचे नियम अथवा शिस्त भंग झाल्यास वादक नोंदणी रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार पथकाच्या कार्यकारिणीस आहे आणि त्यासंबंधित कोणालाही उत्तर देण्यास पथक बांधील राहणार नाही
रुद्रगर्जना पथक हे एक सामूहिक उपक्रम असून पथकाचे काम करणे हे सर्वांची जबाबदारी आहे
वरील सर्व अटी व नियम मान्य असल्यास सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी स्वीकारून पुढे जावे.